भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही । वर्तती गुणीं आपुलाल्या ॥१॥ जैसी क्रिया तैसें फळ । हें तों सकळ जाणती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

त्रिवेणीसंगमी बुडती बहुत । नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥ ज्यांचे कर्म जैसें भोगिती ते फळ । गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दर्शन याचें आदरें घेतां। ओपी सायुज्यता मुक्तीतें ॥१॥ न मानी कोणा साने थोर । दाता उदार जगदानी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दर्शना धांवोनियां जे येती । तयां मुक्ति वोळंगती ॥१॥ ऐसे जोडूनि ठेविलें । युगायगीं उभें केलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दळणीं कांडणीं गाइन मंगळीं । कान्हों वनमाळी प्राणसखा ॥१॥ हरीचिया नामें हरती महादोष । तुटती कर्मपाश निमिषमात्रें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दळणीं दळीतां आठवे मानसीं । अलंकापुरवासी ज्ञानराज ॥१॥ वोविया मंगळी गाईन तयासी । स्वामी तुकयासी निजानंदे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दाटलिया धुई आच्छादी रवितेजा । त्याचिपरी माझा दोष बळी ॥१॥ न चलेचि पुढें तुमची ही युक्ति । सुदर्शन हातीं असोनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति ॥१॥ स्वप्नामाजी सुषुप्ती आंत । जागृतीये मात याचाचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दिसे तोचि जनीं वनीं । विठ्ठल ह्रदयीं त्रिभुवनीं ॥१॥ लेणें नेसणें भूषणें । विठ्ठल वस्त्रें परिधानें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दिसे सगुण हा स्वरुपसुंदर । परि व्यापूनियां ठेला चराचर । देवादानचादि मानव असुर । याविण उरला ऐसा नाहीं तृणांकुर वो ॥१॥ ऐशा गौळणी त्या अनुवाद करिती ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ती । रजनीं दिवो जयां याचीचि संगती । त्या त्या स्वानुभवें आपुल्या बोलती वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रम्हया जाणवलें अंतरी । मग धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिली ॥१॥ ते तों होती समाधिस्थ । ब्रम्हा नेतो हे नेणतीची मात । मग ते नेऊनियां समस्त । सस्यलोकीं बैसविलर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा