भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिसे तोचि जनीं वनीं । विठ्ठल ह्रदयीं त्रिभुवनीं

dise tochi janin vanin | viththal hradayin tribhuvanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दिसे तोचि जनीं वनीं । विठ्ठल ह्रदयीं त्रिभुवनीं ॥१॥ लेणें नेसणें भूषणें । विठ्ठल वस्त्रें परिधानें ॥२॥ अन्न भोजन उदक पान । विठ्ठल सुषुप्ती शयन ॥३॥ निळा म्हणे वाचा बोली । विठ्ठल होऊनियां ठेली ॥४॥