भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझीये संगतीं । आम्ही लागलों नेणतीं

tujhiye sangatin | amhi lagalon nenatin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुझीये संगतीं । आम्ही लागलों नेणतीं ॥१॥ परि तूं कृपावंत हरि । सांभाळिसी सर्वांपरि ॥२॥ शहाणे तूंतें चोजवितीं । उदासी तूं तयांप्रती ॥३॥ निळा म्हणे भाविकाचा । म्हणवी अंकित मी त्याचा ॥४॥