भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखतांचि पंढरी

jhali bhagyachi ujari | drushti dekhatanchi pandhari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखतांचि पंढरी ॥१॥ ठेविले तो कर कटीं । जेणें अवलोकिला दिठी ॥२॥ चंद्रभागे केलें स्नान । भक्तां पुंडलिकाचें दर्शन ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । प्राणी होईल तो निश्चयेंसी ॥४॥