भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला विरह अंतरी कामिनीसी । न ये सांगतां बोलतां कोणापासी । मुख सुकलें वो तापली विशेषी । आंग कापे तेणें झाली कासाविसी वो

jhala virah antari kaminisi | na ye sangatan bolatan konapasi | mukh sukalen vo tapali visheshi | ang kape tenen jhali kasavisi vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
झाला विरह अंतरी कामिनीसी । न ये सांगतां बोलतां कोणापासी । मुख सुकलें वो तापली विशेषी । आंग कापे तेणें झाली कासाविसी वो ॥१॥ हदई आठवे रीरंगसावळा । मनचि गुंतलें तयापासिं डोळा । कोण आणिल वो तया याचि वेळा । दयावया आलिंगन जिव उतावेळा वो ॥२॥ कोठें न गमे वो नावडे आणिक । जिविं जिवामाजि पडियलें ठक । उघडे नयन वो लागलि टकमक । कोण आणिल तो हरिल माझे दु:ख वो ॥३॥ जालि अवस्था ते नकळे कोणासी । जातां सांगो होईल हांसे पिसुणासी । होईल लाज वो कारण उपहासासी । कांहिंची न सुचे मी काय करुं यासी वो ॥४॥ कोण जिवलग वो येईल धांवती । माझें जिविचें आर्त उगविल निगुती । नेदितां कळो कोण आणिल श्रीपति । संग त्याचा माझा करिल एकांति वो ॥५॥ ऐसि विरहानळें पिडियलि बाळा । ह्रदयीं आठविते हरि वेळोवेळा । जाणोनी अंतरीं तो कृपेचा कोवळा । येउनि निवविले तिये म्हणे निळा वो ॥६॥