भजनी मालिका
← भजनांकडे परत

ते म्हणती रे हे सुरपतीची । पूजा आजी देवदेवाची । उच्छिष्ट करुं नये हे कुळींची । आली पध्दति चालत

te mhanati re he surapatichi | puja aji devadevachi | uchchhishta karun naye he kulinchi | ali padhdati chalat

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ते म्हणती रे हे सुरपतीची । पूजा आजी देवदेवाची । उच्छिष्ट करुं नये हे कुळींची । आली पध्दति चालत ॥१॥ ऐंसे एकोनियां गोवळ । धांविले जैसे कृतांतकाळ । कावडी हिरोनियां सकळ । आणिल्या त्या हरिपाशीं ॥२॥ तेणें जाहला हाहाकार । जहाले घाबरे नारीनर । म्हणे केला केला विक्षेप थोर । पूजेमाजी इंद्राचिने ॥३॥ अविवेकी हे धांवोनी आले । बळेंचि इंद्रभाग हिरोनी नेले । यावरी आतां नव्हे भलें । क्षोभलिया सुरपति ॥४॥ कृष्णें उघडूनियां कावडी । गोवळ बैसविले परवडी । म्हणे रे गडिहो सेवा गोडी । अवघियाचीच निवाडे ॥५॥ आजी आम्हींच इंद्र जाहलों । पूजा घेऊनियां तोषलों । बरे उत्तम धणी धालों । तृप्तीवरी स्वीकारा ॥६॥ निळा म्हणे कृष्णचंद्रु । आदि इंद्राचाही इंद्रु । यावरी कृपेचा समुद्रु । करील कौतुक आसमाई ॥७॥