भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठठलीं

techi sant techi sant | jyancha het vithathalin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठठलीं ॥१॥ नेणती कांही टाणेटोणे । नामस्मरणें वांचुनी ॥२॥ काया वाचा आणि मनें । धाले चिंतने डुल्लती ॥३॥ निळा म्हणे विरक्त देहीं । आठवचि नाहीं विषयांचा ॥४॥