भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेणें दणणिंले गोकुळ उतरंडीहि खचल्या सकळ ॥ धांविन्नले गौळी आणि गोवळ । म्हणती हा रवकल्लोळ कशाचा

tenen dananinle gokul utarandihi khachalya sakal || dhanvinnale gauli ani goval | mhanati ha ravakallol kashacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तेणें दणणिंले गोकुळ उतरंडीहि खचल्या सकळ ॥ धांविन्नले गौळी आणि गोवळ । म्हणती हा रवकल्लोळ कशाचा ॥१॥ तंव ते देखती अवघे नयनीं । वृक्ष पडिले ते उन्मळोनी । आश्रचर्य करिती आपुलाले मनीं । म्हणती हे कैसेनी उलंडले ॥२॥ यशोदा सांगे तयांप्रती । बांधला होतां म्या श्रीपती । तेणें येऊनियां आचिती । उखळ वृक्षाबुडीं अडकविलें ॥३॥ गौळणी सांगतां गाहाणें । मीहि संतापलें मनें । तेणें गळां बाधोनियां तान्हें । उखळेंसी म्यां ॥४॥ गेलें आणिकियां कामासीं । कृष्णें उपडूनियां उखळासी । वृक्ष मोडियेलें आवेशीं । माजीं आपणही पडियेला ॥५॥ थोर चुकलें हें अरिष्ट । तळीं सांपडतां होतां पिठ । ऐसें बोलोनियां अदृष्ट । ताडी आपुलिया निज करें ॥६॥ निळा म्हणे घेउनी त्यासी । सफुंदे यशोदा उकसाबुकसी । म्हणें माझिया हषिकेशी । कोणीहि देखों न शकती ॥७॥