भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना

tras upaje majhiya mana | avalokitan tyanchya vadana

रचनाकार: संत निळोबा · अभंग
त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना ॥१॥ जे या दुषिती नामासी । कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥ सांगती पाखंड । बोल बोलोनियां वितंड ॥३॥ निळा म्हणे जाती । घेउनी नरका शिष्यांप्रती ॥४॥