भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही संत दयाघन । आम्हां म्हणऊन विनवितों

tumhi sant dayaghan | amhan mhanaun vinaviton

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुम्ही संत दयाघन । आम्हां म्हणऊन विनवितों ॥१॥ सलगी केंली पायांपाशीं । करा अपराधासी क्षमा त्या ॥२॥ मी तों नेणतेंचि अपत्य । तुम्ही संत मायबाप ॥३॥ निळा म्हणे बोबडे बोल । बोलेन शिकवाल तुम्ही ते ॥४॥