भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोचि ब्रम्हविद जाण । परब्रहमीं वृत्ति लीन

tochi bramhavid jan | parabrahamin vrutti lin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तोचि ब्रम्हविद जाण । परब्रहमीं वृत्ति लीन ॥१॥ व्दैताव्दैत मावळलें । पूर्णब्रम्ह अनुभविलें ॥२॥ जन वन तें समान । मन झालें पैं उन्मन ॥३॥ निळा म्हणे त्यांच्या नांवे । दोष नाशती स्वभावें ॥४॥