भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

शास्त्रज्ञ पंडित तो एक मी मानी । आपणातें देखोनी तन्मय झाला ॥१॥ येरां माझें नमन सर्व साधारण । ग्रंथांचें रक्षण म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शास्त्राचेम हें सार वेदाचें गव्हर । उतरावया पार आणिक नाहीं ॥१॥ विठठल विठठल म्हणा उघडा मंत्र जाणा । कळिकाळ अंकणा होईल तुम्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिकला गाणें राग आळवण । लोकां रंजवण करावया ॥१॥ भक्ताचें तें गाणें बोबडिया बोलीं । तें तें विठ्ठलीं अर्पियलीम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो ॥१॥ जन्मोनियां आमुची पुरविली पाठी । मोडिली राहाटी संसाराची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥ तारक हें नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिवणें टिपणें करोनि आपुलें । नित्य चालवणें संसारिक ॥१॥ गणगोतांमाजीं बरें केलेंज नांव । माझें सत्त्व सर्व बुडविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिवरात्री कथा धन्य जे ऐकती । इच्छिलें पावती सर्व कांहीं ॥१॥ पातकाचा नाश पुण्य वाढे फार । शेखीं विश्वंभर कृपा करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिवादि वंदिती ज्याचे पायवणी । त्यासी पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥१॥ नंद पुण्याचा लेखा न कळे आह्मांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शिशुपाळादिकां कोठें शुद्ध भाव । उद्धरी केशव उंच नीच ॥१॥ काय कामा पुत्रा कोण आले जाणा । सेखीं त्या रावणा कैवल्यदानीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवण करितां तृप्ति नाहीं तुज ॥१॥ माया जातां मथुरे सावध निद्रिस्थ । देखिला भग-चंत्त यशोदेनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शुकादिक ज्याची वर्णिताती कीर्ति । तो ये काकुळती उद्धवासीं ॥१॥ दयेचा सामर बोले तयेवेळां । मजसाठी गोकुळा तुवां जावें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शुद्ध फाल्गुन मासीं वैष्णव ह्रषिकेशी । पंचमीचे दिवशीं सिद्ध जाले ॥१॥ निवृत्तिराज म्हणे जावें म्हाळसापुरीं । जेथें ज्ञानेश्वरई पूर्ण जाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शुद्ध भावार्थचे पाहोनियां पाहे । आनंदला भाव योगियाचा ॥१॥ म्हणे आतां भेटूं बाळमित्न हरि । भक्ताचा कैवारी । कृष्णनाथ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शुभसूचचिन्हें होताती शकुन । तेणें तों ब्राह्मण आनंदला ॥१॥ म्हणे थोर लाभ आजिचा दिसतो । आनंद वाटतो मनामाजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शून्य साकारलें साध्यांत दिसे । आकार नासे तेथें शून्याकार दिसे ॥१॥ शून्य तें सार शून्य तें सार । शून्यिं चराचर सामावलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥ गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हातां नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव