भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिवणें टिपणें करोनि आपुलें । नित्य चालवणें संसारिक

shivanen tipanen karoni apulen | nitya chalavanen sansarik

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शिवणें टिपणें करोनि आपुलें । नित्य चालवणें संसारिक ॥१॥ गणगोतांमाजीं बरें केलेंज नांव । माझें सत्त्व सर्व बुडविलें ॥२॥ कवणें गुणें तुज पडिली बा भुली । सुख या विठ्ठलीं देखिलें काय ॥३॥ तूं भक्त निधडा हा देव धडफुडा । मेळविला जोडा येरवेरां ॥४॥ यासी नाहीं आप तुज नाहीं पर । आमुचा संसार विभांडिला ॥५॥ सरलें आयुष्य उरले थोडे दिस । थोर केली आस होती जीवीं ॥६॥ आमच्या माघारें राखिसी वो नांव । त्वां तंव बरावें दैवा काढियेलेंज ॥७॥ खांदिये भोपळा गळां तुळसीमाळा । जपसी वेळोवेळां रामकृष्णा ॥८॥ तेणें छंद नयनीं अश्रूंचिया धारा । केली ख्याति गव्हारा जनांमाजीं ॥९॥ अरे ऐसें तुवांज बुडविलें कुळ । सांडिली सकळ लोकलाज ॥१०॥ बरवी धरिली दृढ सत्वाची पाउटी । शिकवी दामशेठी नामयासी ॥११॥