भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्यावरी शून्य पाहे । तयावरी शून्य आहे

shunyavari shunya pahe | tayavari shunya ahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शून्यावरी शून्य पाहे । तयावरी शून्य आहे ॥१॥ प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अध:शून्य ॥२॥ उर्ध्वशून्य श्वेतवर्ण । मध्य शून्य शामवर्ण ॥३॥ मह शून्य वर्ण नीळ । त्यांत स्वरूप केवळ ॥४॥ अनुहात घंटा श्रवणीं । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥