भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेतीं बीज नेतां थोडें । मोटे आणिताती गाडे

shetin bij netan thoden | mote anitati gade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शेतीं बीज नेतां थोडें । मोटे आणिताती गाडे ॥१॥ एक्या नामें हरि जोडे । फिटे जन्माचें सांकडें ॥२॥ बाळे भोळे जन । सर्व तरती कीर्तनें ॥३॥ नामा म्हणे नेणें मूढें । नाम स्मरावें साबडें ॥४॥