भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिवरात्री कथा धन्य जे ऐकती । इच्छिलें पावती सर्व कांहीं

shivaratri katha dhanya je aikati | ichchhilen pavati sarva kanhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शिवरात्री कथा धन्य जे ऐकती । इच्छिलें पावती सर्व कांहीं ॥१॥ पातकाचा नाश पुण्य वाढे फार । शेखीं विश्वंभर कृपा करी ॥२॥ भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान । काल करी चरण सेवा त्यांची ॥३॥ नामा म्हणे शिव अक्षरें हीं दोन्हीं । जपावीं सज्जनीं वारंवार ॥४॥