भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध फाल्गुन मासीं वैष्णव ह्रषिकेशी । पंचमीचे दिवशीं सिद्ध जाले

shuddha phalgun masin vaishnav hrashikeshi | panchamiche divashin siddha jale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शुद्ध फाल्गुन मासीं वैष्णव ह्रषिकेशी । पंचमीचे दिवशीं सिद्ध जाले ॥१॥ निवृत्तिराज म्हणे जावें म्हाळसापुरीं । जेथें ज्ञानेश्वरई पूर्ण जाली ॥२॥ उठावले भार देवऋषीश्वर । केला नमस्कार समाधीसी ॥३॥ सव्यहातें क्षेत्र घेतलें वैष्णवांनीं । चाललीं विमानें नेवाशासी ॥४॥ नामा म्हणे देव निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होती ॥५॥