भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवण करितां तृप्ति नाहीं तुज

shuk mhane raya aik parikshiti | shravan karitan trupti nahin tuj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवण करितां तृप्ति नाहीं तुज ॥१॥ माया जातां मथुरे सावध निद्रिस्थ । देखिला भग-चंत्त यशोदेनें ॥२॥ अनंत ब्रह्मांडे उदरीं न कळे कोणाला । वाज-विती थाळा जन्मकाळीं ॥३॥ यज्ञमोक्ता कृष्ण त्यासी देता बोळा । ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव ॥४॥ गौळणी वाहाती नंदालागीं तेव्हां । पुत्रमुख पाहा नामा ह्मणे ॥५॥