भजनी मालिका
← भजनांकडे परत

शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये

shurachen ten shastra krupanachen dhan | vidhvansilya pran hatan naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥ गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हातां नये ॥२॥ सिंहाचें तें नख पतिव्रतेचें स्तन । गेलियाही प्राण हातां नये ॥३॥ विराल्यावांचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हातां नये ॥४॥