भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥ स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणामोल ॥१॥ पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळेचि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥ भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू ॥१॥ फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥ आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दर्शन । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम