भजनी मालिका
← भजनांकडे परत

फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें

phajitakhora mana kiti tuj sangon | nako kona lagon magen magen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥ स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥ निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥ योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥३॥ तुका म्हणे मना पाहें विचारून । होई रे कठिण वज्राऐसें ॥४॥