भजनी मालिका
← भजनांकडे परत

फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें

phodilen bhandar | map gheuniyan kharen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥१॥ केली हरीनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥ देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥२॥ घ्यावें धणीवरी । तुका म्हणे लहान थोरीं ॥३॥