भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी

premasutra dori | neto tikade jaton hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥ मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥ सत्ता सकळ तया हातीं। माझी कींव काकुलती ॥२॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥३॥