भजनी मालिका
← भजनांकडे परत

फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला

phiravilen deul jagamaji khyati | namadeva hatin dudh pyala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥ भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥ मिराबाईंसाठी प्याला तो विषाचा । दामाजीचा जाला पाढेवार ॥२॥ कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥३॥ आतां तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां वेळोवेळा ॥४॥