भजनी मालिका
← भजनांकडे परत

फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे

phal denthinhun jhade | mag maguten na jode

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥ म्हणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥ पुढें चढे हात । त्याग मागिलां उचित ॥२॥ तुका म्हणे रणीं । नये पाहों परतोनि ॥३॥