भजनी मालिका
← भजनांकडे परत

फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी

phal pike denthin | nimitya variyachi bheti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥ हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥ तोडिलिया बळें। वांयां जाती काचीं फळें ॥२॥ तुका म्हणे मन । तेथे आपुलें कारण ॥३॥