पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु
pashumukhen dnyaneshvar | karavilan uchchar vedaghoshu
पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु ॥१॥ तैसेचि तुम्हीं मजही केलें । सामथ्यें वदविलें आपुलिया ॥२॥
pashumukhen dnyaneshvar | karavilan uchchar vedaghoshu
पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु ॥१॥ तैसेचि तुम्हीं मजही केलें । सामथ्यें वदविलें आपुलिया ॥२॥
paha jyachen tayachi pari | jivanabhaten yachya karin
पहा ज्याचें तयाची परी । जीवनभातें याच्या करीं ॥१॥ देऊं जाणे यथाविधी । जैसा भाव तैशी सिध्दी ॥२॥
pahavin paulen nayanin henchi arta | dekhiliya chitta samadhan
पहावीं पाउलें नयनीं हेंचि आर्त । देखिलिया चित्त्ा समाधान ॥१॥ क्षणभंगुर हा येथींचा पसारा । याचिलागीं करा त्वरा आतां ॥२॥
pacharitan dhanvoni yaven | aisen dayaven varadan
पाचारितां धांवोनि यावें । ऐसें दयावें वरदान ॥१॥ मग मी तेणें राहेन सुखें । चिंतन मुखें करीं तुमचें ॥२॥
pacharitan yaven bolavita javen | hen ton na sambhave tumhampashin
पाचारितां यावें बोळविता जावें । हें तों न संभवे तुम्हांपाशीं ॥१॥ जेथिल तेथेंचि प्रगटाल रुपडें । आपुल्या सुरवाडें भक्तांचिया ॥२॥
panduranga tumachi lila | vichitra kala janatiya
पांडुरंगा तुमची लिळा । विचित्र कळा जाणतीया ॥१॥ म्हणोनियां शरणांगत । देवहि अंकित ऋषि तुमचे ॥२॥
panduranga dayaghana | gunanidhana sukhasindhu
पांडुरंगा दयाघना । गुणनिधाना सुखसिंधु ॥१॥ भाव माझा जाणोनियां ठेवा जी पायां जवळिकें ॥२॥
panduranga na pahati | dnyan gadevar bolati
पांडुरंगा न पाहती । ज्ञान गाडेवर बोलती ॥१॥ त्यांचे न व्हावें दर्शन । दूवा दूषिती म्हणऊन ॥२॥
pandurange pandurange | vegin yeni majhe gange
पांडुरंगे पांडुरंगे । वेगीं येंई माझे गंगे ॥१॥ तुजवांचूनि मजला । कोण सांभाळी दयाळा ॥२॥
pandurangen satya kela anugrah | nirasuniyan deh budhdi bhed
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसूनियां देह बुध्दि भेद ॥१॥ येऊनी एकांतीं उपदेशिलीं कानीं । बीजमंत्रें दोन्हीं निजाक्षरें ॥२॥
paduni lagoya chenduvachya eka ghayen | sukhi khele khel sahya karuni hariche pay
पाडूनि लगोया चेंडुवाच्या एका घायें । सुखी खेळे खेळ साह्य करुनि हरीचे पाय ॥१॥ खेळे ऐसा खेळ । मनीं धरुनि घननीळ ॥२॥
pap taya nanv paradaragaman | pap ten paradhan apahar
पाप तया नांव परदारागमन । पाप तें परधन अपहार ॥१॥ पाप तेंचि निंदा परपीडा व्देष । पाप तेंचि उपहास पुढिलाचें ॥२॥
papasaven jinen jyachen | vruthachi tyachen jhalepan
पापासवें जिणें ज्याचें । वृथाचि त्याचें झालेपण ॥१॥ भोगितां भोग रडे मग । म्हणे मी जगनिंदय झालों ॥२॥
papi ani durachari | sahaparivarin santanchya
पापी आणि दुराचारी । सहपरीवारीं संतांच्या ॥१॥ तरले आणिक तरती पुढें दिधलें येवढें सामर्थ्य त्यां ॥२॥
papen purvaj naraka jati | papenchi budati dharma sakal
पापें पूर्वज नरका जाती । पापेंचि बुडती धर्म सकळ ॥१॥ पापेंचि कुळ भंगा जाय । वंशासी होय अपघात ॥२॥
payampashin jiv | theviyala tumachya bhav
पायांपाशीं जीव । ठेवियला तुमच्या भाव ॥१॥ न्याल म्हणोनियां सदना । विठ्ठल देवा कृपाघना ॥२॥
payin chitta hen rahilen | bramharup pain jahalen
पायीं चित्त हें राहिलें । ब्रम्हरुप पैं जाहलें ॥१॥ मन झालें हें उन्मन । स्वरुपीं झालें तें लीन ॥२॥
payin lin hota nila | didhala kala premachi
पायीं लीन होता निळा । दिधला कळा प्रेमाची ॥१॥ निववूनियां केला सुखी । ठेउनी मुखीं निज नाम ॥२॥
paloniya lale | bahuten vadhavilin balen
पाळोनिया लळे । बहुतें वाढविलीं बाळें ॥१॥ मजचि कां वो मोकलिलें । विउनी उदासचि टाकिलें ॥२॥
pavale te jhale sukhi | jyanchi bolakhi santacharanin
पावले ते झाले सुखी । ज्यांची बोळखी संतचरणीं ॥१॥ कीटक पतंग पशु याती । मानव सत्संगतीं उध्दरले ॥२॥