भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाचारितां धांवोनि यावें । ऐसें दयावें वरदान

pacharitan dhanvoni yaven | aisen dayaven varadan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाचारितां धांवोनि यावें । ऐसें दयावें वरदान ॥१॥ मग मी तेणें राहेन सुखें । चिंतन मुखें करीं तुमचें ॥२॥ आळवील आवडी नामें । गाईन प्रेमें गुण गीर्ती ॥३॥ निळा म्हणे उदारपणें । करा हो देणें कृपेचें ॥४॥