भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहावीं पाउलें नयनीं हेंचि आर्त । देखिलिया चित्त्‍ा समाधान

pahavin paulen nayanin henchi arta | dekhiliya chitt‍a samadhan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पहावीं पाउलें नयनीं हेंचि आर्त । देखिलिया चित्त्‍ा समाधान ॥१॥ क्षणभंगुर हा येथींचा पसारा । याचिलागीं करा त्वरा आतां ॥२॥ पाहोनि श्रीमुख धरीन ह्रदयीं । मग हो भलतें कांही देहा प्राणा ॥३॥ आल्याचें सार्थक हेंचि नरदेहा । नाहीं तरि हाहाभूत सर्व ॥४॥ म्हणोनि लवलाहो करितों याचिसाठीं । तुमच्या व्हावी भेटी पायापाशीं ॥५॥ निळा म्हणे आतां विलंब न करावा । येऊनियां देवा सांगावे ॥६॥