भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायांपाशीं जीव । ठेवियला तुमच्या भाव

payampashin jiv | theviyala tumachya bhav

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पायांपाशीं जीव । ठेवियला तुमच्या भाव ॥१॥ न्याल म्हणोनियां सदना । विठ्ठल देवा कृपाघना ॥२॥ आळवितों नामें । लाहो करुनियां प्रेमें ॥३॥ निळा म्हणे दिवसरातीं । दुजे नेणोनियां चित्तीं ॥४॥