भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावले ते झाले सुखी । ज्यांची बोळखी संतचरणीं

pavale te jhale sukhi | jyanchi bolakhi santacharanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पावले ते झाले सुखी । ज्यांची बोळखी संतचरणीं ॥१॥ कीटक पतंग पशु याती । मानव सत्संगतीं उध्दरले ॥२॥ जिहीं विश्वास धरिला पायीं । तरले ते डोहीं भवाब्धीच्या ॥३॥ निळा म्हणे निर्वाणरुप । पावले स्वरुप श्रीहरीचें ॥४॥