भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळोनिया लळे । बहुतें वाढविलीं बाळें

paloniya lale | bahuten vadhavilin balen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाळोनिया लळे । बहुतें वाढविलीं बाळें ॥१॥ मजचि कां वो मोकलिलें । विउनी उदासचि टाकिलें ॥२॥ नाहीं दिलें स्तनपान । नेणें खाऊं जेऊं अन्न ॥३॥ निळा म्हणे दुजें कोण । करील सांगा प्रतिपाळण ॥४॥