भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापें पूर्वज नरका जाती । पापेंचि बुडती धर्म सकळ

papen purvaj naraka jati | papenchi budati dharma sakal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पापें पूर्वज नरका जाती । पापेंचि बुडती धर्म सकळ ॥१॥ पापेंचि कुळ भंगा जाय । वंशासी होय अपघात ॥२॥ पापेंचि यश कीर्ति पळें । पापेंचि सोहळे दरिद्राचे ॥३॥ निळा म्हणे घडतां पापेंचि पतनीं । पडती यातनीं पूर्वजेंसी ॥४॥