भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहा ज्याचें तयाची परी । जीवनभातें याच्या करीं

paha jyachen tayachi pari | jivanabhaten yachya karin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पहा ज्याचें तयाची परी । जीवनभातें याच्या करीं ॥१॥ देऊं जाणे यथाविधी । जैसा भाव तैशी सिध्दी ॥२॥ उंच नीच अधिकारें पावती आपुलाल्या व्यापारें ॥३॥ निळा म्हणे ज्यापरी रवी । ज्याचे वेवसाय तया दावी ॥४॥