भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाप तया नांव परदारागमन । पाप तें परधन अपहार

pap taya nanv paradaragaman | pap ten paradhan apahar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाप तया नांव परदारागमन । पाप तें परधन अपहार ॥१॥ पाप तेंचि निंदा परपीडा व्देष । पाप तेंचि उपहास पुढिलाचें ॥२॥ पाप तेंचि जीवीं विषयाची आसक्ति । पाप अभक्तीं कुळाचारीं ॥३॥ निळा म्हणे पाप मुख्य तेंचि साचें । नावडे देवाचें नाम मुखीं ॥४॥