भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

पावले ब्राम्हण अलंकापुरासी । आनंदमानसीं न समाये तो ॥१॥ देखिला दंडक्षेत्रवासी जन । प्रात:काळीं प्रश्न करिती तीर्थी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान ॥१॥ मायबाप माझा उभा कृपादानीं । विटे सम जोडुनि पदांबुजें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पावो माझीं हेचि सेवा । करितों नित्यानित्य देवा ॥१॥ तुजचि आवडीच्या सुखें । गातों वार्णितों ते मुखें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पासुनी तुम्हां न वेजे दुरी । क्षण घटिकाभरी वेगळा ॥१॥ चालातां तुम्हां धांवे पुढें । मागेंही वोढे सरिसाचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पाहों गेलिया वो नंदाचा नंदन । नेत्रीं लेऊनियां आतींचे अंजन । जेथें उभा होता राजीवलोचन । भोंवते मेळवुनी गडि संतसज्जनें वो ॥१॥ दृष्टी तेथेंहि निवाली वो इंद्रियें सकळ । जालि तटस्थचि देखोनियां घननीळ । मुकुट विराजित कुंडलें वनमाळ । सुंदर श्रीमुख चतुर्भुज सरळ वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पाहों जातां देखणे तेंचि । जाणता जाणणेंचि होईजे अंगें ॥१॥ आतां कैसें सांगावें यावरी । बोलतांचि वैखरी गिळूनि जाये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पाहोनियां सकळ मतांतरें । बैसला धुरें जाणतीयां ॥१॥ परि ते दुर्लभ निपुण ज्ञानी । जे कां जाणोनि नेणते ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पिंगा म्हणिजे पिलंगोनि भिरभिरियाचे परी । फिराविसी माज मान तरि तुझी थोरी ॥१॥ चित्त हरिवरी गे ठेवूनि दे भोंवरी । नाहींतरी सर परती येथूनि जाय दुरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पुंडलिकें आणिला घरां । त्रेलोक्यसोयरा कुटुंबाळू ॥१॥ सोळा सहस्त्र आत:पुरे कन्या कुमरे दास दासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा