भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांवा वाजवी मोहरी

panva vajavi mohari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पांवा वाजवी मोहरी । बार हमामा हुंबरी ॥१॥ नाचे गोपाळांच्या छंदें । क्रीडा करी ब्रम्हानंदें ॥२॥ सांगोनी येरयेरां काहाणी । कोडीं उगविती उमाणीं ॥३॥ निळा म्हणे नाना सोंगें । संपादिलीं पांडुरंगें ॥४॥