भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

दशमीचे दिवशीं ठेविलें प्रस्थान । साधियेला येणें देव गुरु ॥१॥ दिधला मंडप सिद्धेश्वरासमोर । उठावले भार वैष्णवांचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दशरथ राजा उठिला तेथुनी । कौसल्ये सदनीं जातां झाला ॥१॥ पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरीं तेज निचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दशरथ राजा संतान तें नाहीं । ह्मणोनियां पाही ऋषेश्वरीं ॥१॥ करूनि विनंति पुत्रेष्टी हे केली । पुरोडांश भक्षिली पत्नियांनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥ वसुनाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परी-क्षिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दामाशेठी म्हणे वेव्हार कोणासी । केला तो आम्हांसी सांग नाम्या ॥१॥ गणोबा नाईक नाम हें जयाचें । सावकार साचे पुरातन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा । परंज्योति नारायणा तुज नमो ॥१॥ विश्वव्यापका जनार्दना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी ॥१॥ आपुल्या मानसीं विचारूनि पाहे । सावधान होये तुझे पाई ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दावी जडबुद्धि जारण मारण । नागवें हिंडणें काय काज ॥१॥ दावी उग्र तप केले उपवास । फिरतांही देश काय काज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दास जाल्यावरी करिसी उदास । मनीं तें तुम्हांस आणी देवा ॥१॥ सोशिले प्रवास जन्मजन्मांतर । करिसी अव्हेर आम्हांलागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥ विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दिशा फेरफेरे कष्टशील सैरा । किती येरझारा कल्प-कोटी ॥१॥ विठ्ठलाचे नामीं दृढ धरीं पाव । येर सांडीं वाव मृग-जळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दिसंदिस कैसा झालासी शहणा । गोवळांसी खेळसी पंढरीच्या राण्या ॥१॥ विश्वामाजी तुझे बोभाट मोठे । जन्ममरणाचे संकल्प तुटे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दु:खाची निव्रुत्ति सुखाचे तें सुख । पाहतां श्रीमुख गोविंदाचें ॥१॥ रंगणीं रांगत गुलगुला बोलत । असूर रुळत चर- णातळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा ॥१॥ बोल गा बोल मजशी कांहीं । दृष्टी उघडुनी मजकडे पाही गा विठोबा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दुरोनि ओळंगिल्या अविनाश देताहे । तो जवळी जातां काय देईल नेणों ॥१॥ ऐसा तूं कृपाळु लक्षुमीचा कांत । सांडूनि होतात कष्टी झणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दुरोनि देखिलें द्वारकानगर । अवघॆं कनकाकार वितिवेले ॥१॥ येथें देवराणा नांदतो तो ठाव । काय म्यां वर्णावें मंदमति ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ॥१॥ आणि प्रकार घडे तो निकट । पैठणीं प्रकट रूप दावीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव