भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीनाची माउली । आजि म्यां देखिली

dinachi mauli | aji myan dekhili

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दीनाची माउली । आजि म्यां देखिली ॥१॥ कटीं ठेवू -निया कर । उभी राहे विटेवर ॥२॥ मुगुट रत्नांचा साजिरा । वरी मोतियांचा तुरा ॥३॥ रूप लावण्य गोजिरें । ह्लदयीं पदक साजिरें ॥४॥ कासे पिंवळा पीताबर । चरणीं ब्रिदाचा तोडर ॥५॥ भक्तां कृपेची सावली । नामा वंदी पायधुळी ॥६॥