भजनी मालिका
← भजनांकडे परत

दशरथ राजा उठिला तेथुनी । कौसल्ये सदनीं जातां झाला

dasharath raja uthila tethuni | kausalye sadanin jatan jhala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दशरथ राजा उठिला तेथुनी । कौसल्ये सदनीं जातां झाला ॥१॥ पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरीं तेज निचे ॥२॥ तुझिये मानसीं होती जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपाशीं ॥३॥ उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथें कैंची उरी देहभावा ॥४॥ सदा समाधिस्थ रामरूप झाली । कौसल्या माउली नामा म्हणे ॥५॥