भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा

duruni alon tujhiya bheti | sangavaya jivinchya goshti ga vithoba

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा ॥१॥ बोल गा बोल मजशी कांहीं । दृष्टी उघडुनी मजकडे पाही गा विठोबा ॥२॥ अरे तूं कृपाळु दीनाचा । महा उदार थोरा मनाचा गा विठोबा ॥३॥ भक्तें पुंडलिकें गोविलासी लोभें । प्रेमें प्रीतीच्या वालभें गा विठोबा ॥४॥ युगें अठ्ठावीस भरलीं । धणी अजुनी नाहीं पुरली गा विठोबा ॥५॥ प्राण होती माझे कासाविस । नामा म्हणे कां धरिलें उदास गा विठोबा ॥६॥