भजनी मालिका
← भजनांकडे परत

दामाशेठी म्हणे वेव्हार कोणासी । केला तो आम्हांसी सांग नाम्या

damashethi mhane vevhar konasi | kela to amhansi sang namya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दामाशेठी म्हणे वेव्हार कोणासी । केला तो आम्हांसी सांग नाम्या ॥१॥ गणोबा नाईक नाम हें जयाचें । सावकार साचे पुरातन ॥२॥ तयांचे दुकानीं वेंचिलें कापडा । आठांवारीं तोड ऐवजासी ॥३॥ दामाशेठी म्हणे नामया सुजाणा । वेगीं द्रव्य आणा जाऊनियां ॥४॥