भजनी मालिका
← भजनांकडे परत

दु:खासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी

du:khasan draupadisi | gheuni ala to sabhesi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दु:खासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥१॥ दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥२॥ आतां उपाय कृष्णा काय । धांवें माझे विठ्ठल माय ॥३॥ निरी ओढितां दुर्जन । झालें आणिक निर्माण ॥४॥ ऐसीं असंख्य फेडिलीं । देवीं तितुकीं पुरविलीं ॥५॥ तया संतां राखिलें कैसें । जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥