भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिवस गेले वायांविण । देवा तुज न रिघतां शरण

divas gele vayanvin | deva tuj na righatan sharan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दिवस गेले वायांविण । देवा तुज न रिघतां शरण । बाळत्व गेलें अज्ञानपण । तैं आठवण नव्हेचि ॥१॥ आला तारुण्याचा अवसरु । सवेंचि विषयाचा पडिभरु । कामक्रोध मदमछरु । अति व्यापारु तृष्णेचाअ ॥२॥ सवेंचि वृद्धपण पातलें । सकळ इंद्रियें सोडिलें । देहन करीच म्हणितलें । आंतर पडलें भक्तीसी ॥३॥ कांही हित नव्हेची माझें । दास्य न घडेचि तुझें । आयुष्य वेचिलें वीण काजे । धरणी वोझें पैं जालोम ॥४॥ पुनरपि जन्मा येईन मागुता । कोण जाणे कैसी अवच्छा । तुज मी ध्याईन अनंता । ऐसा लहाना कैंज होईन ॥५॥ तुझ्या नामाचा वोरस । तेणें चुके गर्भवास । नामा म्हणे विष्णुदास । देई सौरस आपुलें नामीं ॥६॥