भजनी मालिका
← भजनांकडे परत

दशरथ राजा संतान तें नाहीं । ह्मणोनियां पाही ऋषेश्वरीं

dasharath raja santan ten nahin | hmanoniyan pahi rusheshvarin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दशरथ राजा संतान तें नाहीं । ह्मणोनियां पाही ऋषेश्वरीं ॥१॥ करूनि विनंति पुत्रेष्टी हे केली । पुरोडांश भक्षिली पत्नियांनीं ॥२॥ तपाच्या समार्थ्यें पुत्र चार झाले । अविनाश आले अवतारासी ॥३॥ रघुपति रामें पूर्ण मुसावलें । चैतन्य प्रगटलें कौसल्येसी ॥४॥ तेनें केली ख्याति राक्षस मारिले । रा-मराज्य केलें त्रैलोक्यांत ॥५॥ नामा म्हणे मज नाम गोड आहे । त्यालागीं तूं पाहे विचारुनी ॥६॥