भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

वेधिलें ज्यांचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥१॥ प्रपंच परमार्थ त्यासी पैं सारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेरझार खुंटे नाम वदतां वाचे । आणिक सायासाचें न करीं कोड ॥१॥ तुटे रे बंधन नोहेंचि पतन । वाचे जनार्दन जप करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेव्हाराच्या ठाई । तुझें न चले कांहीं । मी तूं दोघे पाहीं । सरिसें तेथें ॥१॥ ठेविलें बुडविसी । शेखी जाबही न देसी । ऐकोन नायकसी । गहिंसपणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेश्येचिया घरी जातो उताविळा । जातांची देउळा रडतसे ॥१॥ काय ऐशा पामरा सांगावें गव्हारा । भोगितो अघोरा नरकवासा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेष घेउनी नुसता कां । उगेच जगावरी रुसतां कां । भोग देखोनि घुसतां कां । आम्हीं भले म्हणोनि पुसतां कां ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

वेष पालटोनी देव कुंभार पैं जाहले । गरुडासी केलें गाढव तेव्हां ॥१॥ येऊनियां तेरें पुसतसे लोकां । कुल्लाळ तो देखा गोरा कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामें पाश दृढ तुटती ॥१॥ तारिलें वानर वनचरे रामें । गोपिका त्या कामें मुक्त केल्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैकुंठीचा राणा येउनी लवलाहो । सुकुमारा पाहे अवलोकुनी ॥१॥ धांवूनियां देव गळां घाली मिठी । आलिंगला पोटीं सदगदित ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां ॥१॥ धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैकुंठीचे वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥ बहुतांसी लाभ देतां घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जगीं त्याचा ॥१॥ आठवी नित्य नाम सदा वाचे । कळिकाळ त्यांचें चरण चुरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैजंयती माळ किरीट कुंडलें । रुप तें सांवळें विटेवरी ॥१॥ वेधलें वो मन तयांच्या चरणीं । होताती पारणीं डोळीयांची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वैराग्य अनुताप जाहलियावांचुन । रामनाम वदनीं न ये बापा ॥१॥ मुख्यत्वें कारण साधीं हें भजन । येणें समाधान होय बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ