भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेधोनि नेलें आमुचें मन । लागलें ध्यान अंतरीं

vedhoni nelen amuchen man | lagalen dhyan antarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेधोनि नेलें आमुचें मन । लागलें ध्यान अंतरीं ॥१॥ दृष्टी धांवें पाहावया । आलिंगना बाह्मा उतावेळ ॥२॥ चरण उतावेळ चालतां पंथ । दुजा हेत नाहीं मनासी ॥३॥ एका जनार्दनीं डोई पायीं । दुजा भाव नाहीं इंद्रियां ॥४॥