भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठीचें वैभव । संतांपांयीं वसे सर्व

vaikunthichen vaibhav | santampanyin vase sarva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैकुंठीचें वैभव । संतांपांयीं वसे सर्व ॥१॥ संत उदार उदार । देतो मोक्षांचे भांडार ॥२॥ अनन्य भावें धरा चाड । मग सुरवाड सुख पुढे ॥३॥ एका जनार्दनीं ठाव । नोहे भाव पालट ॥४॥