भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठीचे वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें

vaikunthiche vaibhav pandharisi alen | bhakten santhavilen pundaliken

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैकुंठीचे वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥ बहुतांसी लाभ देतां घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥ योग याग साधने करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ॥३॥ हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहतां विठ्ठलमूर्ती मुक्त होती ॥४॥ एका जनार्दनीं सुखाचे माहेर । बरवें भीमातीर उत्तम तें ॥५॥