भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैजयंती वनमाळा गळां । टिळक रेखिला कस्तुरी

vaijayanti vanamala galan | tilak rekhila kasturi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैजयंती वनमाळा गळां । टिळक रेखिला कस्तुरी ॥१॥ अंगीं चंदन साजे उटी । शोभे कंठी कठसूत्र ॥२॥ शंख चक्र पद्म मिरवें करी । बाह्मा उभारीं भाविकां ॥३॥ वेधी वेधोनि आमुचें मन । शरण एका जनार्दन ॥४॥